आयुर्विमा सल्लागार का बनावे?


आयुर्विमा सल्लागार का बनावे? 
भारतात आयुर्वम्यिाचे प्रमाण केवळ ४ टक्के आहे. १२५ कोटी लोकांचा देश आणि आयुर्वम्यिाबाबत आकलन मात्र फारच कमी. खरे तर आपल्या देशात आयुर्वम्यिाची विक्रीला मोठय़ा व्यवसायाचे स्वरूप देणाऱ्या संस्था असायला हव्यात.
एके रात्री प्रचंड पाऊस पडला. सकाळ देखील ढगाळ होती. बाहेर काहीच विशेष घडत नव्हते. नियमित येणारा पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत नसल्याने मला नेहमीपेक्षा वेगळे वाटले. या विचारात असतानाच मोबाइल वाजला आणि मी पैशांचे पाकिट व मोबाइल घेऊन मित्राच्या घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पहिल्यांदाच मला वाटले की माझे पाय फार जड झाले आहेत आणि मला चालण्यासाठी पाय अक्षरश: ओढत न्यावे लागत होते. मी माझा लहानपणापासूनच्या मित्र आणि यशस्वी उद्योजक जयंत जोशीच्या घरी पोहोचलो. माझे हात थरथरत होते आणि आत जाण्यासाठी मी गेट ढकलले. आत गेल्यावर पाहिले तर सर्वत्र शांतता होती, चंदन जळण्याचा वास येत होता आणि माझा बालमित्र जमिनीवर निष्प्राण होऊन पडला होता. हो. निष्प्राण. वयाच्या ४७व्या वर्षी.
त्याच्या मुलाने मला फोन केला होता आणि जयंत मॉर्निंग वॉकला बाहेर पडला तेव्हा त्याचा अपघात झाल्याचे मला कळवले होते. काही वेळा अशा ठिकाणी गॉसिपला ऊत येतो. हेच येथेही घडले. जयंत नाजूक आर्थिक स्थितीमध्ये असल्याची कुणकुण माझ्या कानावर आली. त्याने वर्षभरापूर्वी कर्ज घेतले होते आणि काही मालमत्ता त्याला विकावी लागली. त्याची आर्थिक स्थिती ढासळली होती आणि त्याचे कुटुंबीय कठीण काळातून जात होते. सगळेजण त्याच्या कुटुंबीयांबाबत चर्चा करत होते आणि ते कसे जगत होते याविषयी बोलत होते. गर्दी वाढतच जात होती आणि काहीच वेळात त्याला अग्नी दिला जाणार होता. त्यानंतरचे २४ तास त्याच्या दु:खात निघून गेले. दुसऱ्या दिवशी सूर्य नवी सकाळ घेऊन आल्यावर कोणाच्याही काही लक्षात नव्हते. जयंत गेला होता, पण आयुष्य पुढे सुरूच होते. कुटुंबाला सगळे दु:ख विसरून पुढे जाणे भाग होते. त्याच्या मुलांचे शिक्षण पुढे सुरू ठेवणे गरजेचे होते. संपूर्ण घर संकटात होते. शेजारी आणि काही निकटचे नातेवाईक घर चालवण्यासाठी हातभार लावत होते. यूज अँड थ्रो ग्लासमध्ये चहा दिला जात होता. पुढे काय करायचे हे ठरवण्यासाठी घरातील वयस्क एकत्र आले होते.
काही जण सांत्वन करण्यासाठी आले होते आणि एक वयस्क व्यक्ती घरात हळूच कधी आली आणि खोलीतल्या एका कोपऱ्यात कधी बसली ते कोणालाच कळले नाही. त्याने जयंतच्या मोठय़ा फोटोकडे पाहिले. त्या फोटोवर आता हार घातला होता. गुळगुळीत दाढी केलेला, स्मार्ट ६० वर्षे वयाचा माणूस हळुवार म्हणाला,  सर, तुमच्या दृष्टिकोनाचे आणि तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे अभिनंदन करायला हवे. तो माणूस हे बोलल्यावर सगळय़ांच्या प्रश्नार्थक नजरा त्याच्याकडे वळल्या. भावना लक्षात घेता वयस्क व्यक्ती म्हणाले की, मी सुनील शंकर, आयुर्वमिा सल्लागार.मी जयंतसोबत काम केले. त्याचे त्याच्या कुटुंबावर इतके प्रेम होते की मी त्याच्या मोठय़ा कर्जाला आर्थिक संरक्षक कवच देण्याबाबत त्याला भेटलो तेव्हा त्याने जोखीम लक्षात घेतली आणि ते कवच खरेदी करायचे ठरवले. मी ३ कोटी रुपयांचा धनादेश त्याच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आलो आहे. जयंतने २ कोटी रुपयांची जीवनकवच खरेदी केले होते आणि अतिरिक्त १ कोटी रुपये त्याने स्वतंत्रपणे खरेदी केलेल्या कव्हरमुळे अपघाती मृत्यूच्या कारणाने देण्यात येत आहेत. संपूर्ण खोलीत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. जयंतच्या पत्नीला अश्रू लपवताना मी पाहिले. जयंतचे त्याच्या कुटुंबावर असलेले प्रेम व काळजी त्यातून दिसत होती. तो खरेच गेला होता का?
हे सगळे घडत असताना माझ्या मनात येत होते की, सुनील शंकरसारखे दारात मदतीला उभे राहतील असे नशीबवान किती जण असतील. आपल्याशी आपल्या कुटुंबाबात बोलण्यास इच्छुक असलेल्या सुनील शंकरला सारख्या आयुर्विमा एजेंटला भेटायचीही आपली तयारी नसल्याचे प्रकार किती वेळा घडतात. माझ्या मनात पहिला प्रश्न आला की एखादी व्यक्ती आयुर्वमिा एजंट का होते? मला या व्यवसायाबद्दल कधीच कल्पना नव्हती. सर्वप्रथम हे प्रोफेशन होते का? मी डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनीअर होणाऱ्यांविषयी ऐकले होते. मी या ६० वर्षीय वयस्क व्यक्तीशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि हा माझा निर्णय अत्यंत वास्तवदर्शी व बौद्धिक चच्रेचा अनुभव देणारा ठरला.तो यशस्वी निवृत्त बँकर होता. त्याने आपल्या मुलांसाठी पुरेशी तरतूद केली होती आणि निवृत्तीनंतरच्या काळात त्याला आपल्या मुलांवर अवलंबून राहायचे नव्हते. त्याला अशा प्रकारचे काम हवे होते जिथे कामाच्या वेळांबाबत लवचीकता असेल आणि दीर्घकाळासाठी पैसे कमवता येतील. आणि शंकर यांनी मला सर्व तपशील दिला.धर्म, जात, शैक्षणिक पाश्र्वभूमी, वय काहीही असले तरी कोणीही एजंट बनू शकतो. हे एकदम खास क्षेत्र आहे, ज्यामध्ये मी लोकांना त्यांच्या अर्थार्जनाला असलेल्या धोक्याचे नियोजन करण्यासाठी मदत करतो. मला हवा आहे तितका काळ आणि मला हवेय त्या वेळी मी काम करू शकतो. एक विक्री केल्यामुळे मला त्या वर्षांसाठी उत्पन्न मिळतेच, शिवाय योजना सुरू राहीपर्यंत माझे उत्पन्न सुरू राहते. त्यामुळे प्रत्येक योजनेच्या विक्रीसोबत मी माझ्या पुढच्या वर्षांसाठी मी निधी उभारत असतो. आणि या क्षेत्राची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते, जेथे जगभरातील वित्तीय व्यावसायिक एकत्र येतात आणि त्यांच्या अनुभवांची देवाण-घेवाण करतात. मी हे सगळे कमावण्याबरोबरच, माझे क्षेत्र मला समाजासाठी योगदान देण्याची संधी देते, एका चांगल्या गोष्टीसाठी काम करण्याची संधी देते.त्याने पुढे जे सांगितले त्यामुळे मी चकित झालो. भारतात आयुर्वम्यिाचे प्रमाण केवळ ४ टक्के आहे. १२५ कोटी लोकांचा देश आणि आयुर्वम्यिाबाबत आकलन मात्र फारच कमी दिसते.  मी स्वत:विषयी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, मीही त्या गर्दीतलाच एक होतो. किती तरी वेळा मी आयुर्वमिा सल्लागाराच्या माहितीकडे दुर्लक्ष केले. माझ्यासाठी योजना घ्यावी म्हणून वडिलांनी किती वेळा प्रयत्न केला होता आणि केवळ करविषयक फायद्यासाठी योजना खरेदी करणे हे मला आठवले. शंकर सांगत होते आणि त्यांच्या डोळय़ांत मला वेदनेची झालर दिसत होती. आपल्या समाजात आयुर्विमा एजंट किंवा LIC Agent या शब्दालाच चुकीचे वलय आहे. एक जबाबदार समाज म्हणून आपण आयुर्वम्यिाची गरज ओळखत नाही, याकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचे आपल्या शाळा व महाविद्यालयांत शिकवले जात नाही. आयुर्वमिा एजंट ही अशी व्यक्ती असते जी तुमच्या व्यस्त आयुष्यात तुम्हाला आर्थिक जोखमींविषयी विचार करायला लावते आणि कुटुंबावर अशी वेळ ओढवल्यास सर्वात वाईट काळातून जाण्यासाठी तुमची तयारी करण्यासाठी विचार करायला लावते. दरम्यान, जयंतची पत्नी आली आणि त्याने पतीला दिलेल्या योग्य सल्ल्याबद्दल त्याचे आभार मानले. तो उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी केवळ जयंतला तुम्हा सर्वाबाबत विचार करायला लावले. त्याचे तुम्हा सगळय़ांवर फार प्रेम होते आणि त्याने अचूक निर्णय घेतला. आज, मी त्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.तो माझ्याकडे पाहून म्हणाला, ‘आयुर्वम्यिाची विक्री करायला मोठय़ा व्यवसायाचे स्वरूप देणाऱ्या संस्था असायला हव्या होत्या. पालक आपल्या पाल्यांना आयुर्वमिा सल्लागार होण्यास सांगतील आणि त्यांचे संभाषण डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट वा इंजिनीअर होण्यापुरते मर्यादित राहणार नाही, असा दिवस येवो.त्याने हस्तांदोलन केले आणि तो निघून गेला. त्याचे शब्द माझ्या डोक्यात घोळत राहिले. मला बदलता काळ जाणवू लागला. क्षणभर आपण माहिती बाजूला ठेवली तर जाणवेल की आयुर्वमिा कवच दिसण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे आणि कदाचित हे सुनील शंकर यासारख्या एका एलआयसी एजंट मुळे झाले असावे.
आपला नम्र,
अशोक सोनकुसळे
विकास अधिकारी भारतीय आयुर्विमा महामंडळ ठाणे डिविजन Mob:- 9967142068

No comments:

Post a Comment